सण एक, रूप अनेक

 



येतो सण, जातो सण, 
साजरे करण्यात वेगळेपण|

राजकारणी देती आश्वासन, 
 उणे-दुणे ,गरळातून शरसंधान|

 कुणा संधी सोन्याची
पैश्यातून पैसे मिळवण्याची|

जाहिराती ,वातावरण आभासाचे, 
बाजार पेठा तुडुंब भरवण्याचे|

कुणी भरवती इव्हेंट मोठे, 
गळाला लावण्या  सारे छोटे|

कोणी जपी रित-भात नी नाती, 
मित्र, नातेवाईक एकत्र येती|

कुणी आई बाप करती मुलांची हौस, 
खंड नसे त्यांच्या कष्टांस|

श्रीमंतांसाठी संधी असे मिरवण्याची, 
कपडे,दागिने ,लक्ष्मीच्या प्रदर्शनाची|

कुणा क्षण असती हर्षोल्हासाचे, 
तापत्रयीतून बाहेर डोकावण्याचे|

कुणा असे जगण्याची भ्रांत, 
हाता-तोंडाची गाठ पडो हीच खरी शर्यत|

सर्वांची देवाकडे एकच आस, 
सुखी घडो जीवन प्रवास|

सण आहेत वारसा संस्कृतीचा, 
निसर्ग आणि मानवाच्या समन्वयाचा|

सण आहेत जागर दैवी शक्तींचा , 
पडू देवू नका विसर मानव्य शक्तींचा|
🙏❤



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा