चंद्र (कविता)

 

चंद्र🌜🌟

प्रतिक असे शीतलतेचे
शीतस्त्रोत प्रकाशाचा 


मस्तक शोभे शिवगणेशाचे
 संदेश देई शांततेचा


भासे कुणा वदन प्रेयसीचे
  संपे काळ प्रतिक्षेचा


खास नाते पृथ्वीचे त्याचे
  चांदोमामा बालकांचा


सौंदर्य खुले आकाशाचे
  प्रियतम तारकांचा


खेळ असे सावल्यांचा
सखा पृथ्वीवासियांचा


गूढ अस्तित्व लोभसतेचे
लाडका कवींचा ||



.....अर्चना


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा