देवीची नऊ रूपे
शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे.शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे पूजा-कृत्य घडते.आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून , नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले .
देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.
१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडा किंवा (कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९.सिद्धिदात्री
अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.त्यांचे वर्णन संक्षिप्त रूपात कवितेमधून पाहूया.
(सर्व प्रतिमा गुगलच्या सौजन्याने)
सौ. अर्चना मुरुगकर
9762863231
तळेगाव दाभाडे, पुणे.
🙏🙏
छान माहिती,देवीची प्रत्चेक तसबीर मनभावन,आणि त्यासोबतचे काव्यही करी मनप्रसन्न।
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏🙏
उत्तर द्याहटवा