सण म्हणजे काय ❓






सण म्हणजे काय❓

सण ठेवा संस्कृतीचा 
जगण्याची रीत कळे
समन्वय निसर्गाशी
मानवाचा सणांमुळे

शेतकरी आणि शेती
असे निसर्ग  सांगाती
 निसर्गाची करी पूजा
कामा संगे बळीराजा. 

बनू नका अंधश्रद्ध
सणामागे असे शास्त्र
संस्कृतीचे संवहन
करा उघडे ठेवून नेत्र. 

नका आणू कर्मठता
जाणा सणाची महत्ता
वनौषधी  पुष्पलता
जगा देऊ सात्विकता. 

नको नासाडी पैशाची
अन्नौषधी नैवेद्याची
मैत्री करा आप्तेष्टांची
हिच महती सणांची.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा