आॅनलाईन दिवाळी
लवकरच दिवाळी येणार
पोस्ट्स चा पाऊस होणार
गॅलरी खच्च भरून जाणार
दिवाळी आॅनलाईन होणार.
रंगीत दिवे ,रांगोळ्या, जीफस्
गाणी, लेख, माहिती सुंदर
सगळ्या भाषेतील पोस्टस् चा
भडिमार होतो दिवस चार.
आपणही सरसावतो पुढे
चिकटवतो पोस्टस् चार नवे
चम-चम लक्ष्मी, लाडू चिवडा
फोटो-व्हिडिओ सारे देखावे.
कार्ड, दिवाळीअंक झाले जुने आॅनलाईन फराळाने तृप्त पाहुणे
बिझनेस प्रमोशन, पार्ट्या, मैफिली
आॅनलाईन बनली कोरोनाने.
दुरून का होईना भेटतील सारे
मित्र, आजी-नातवंडे भरती मेळे
आभासी जगाने वातावरण निर्मिले
माणसाचे सर्वांशी धागे जोडले.
सौ. अर्चना मुरूगकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा