गोजिरी दिवाळी

 


गोजिरी दिवाळी

 दीपमाला यक्षरात्री 
सण मोठा सुखरात्री
नवी पिके आली घरी 
आनंदित शेतकरी. 

आई असे आॅफिसात
बंद मिठाई खोक्यात. 
तोच आनंद मनात
मग्न जरी खरेदीत. 

पिके नासधूस झाली
डोळयातल्या पाण्यासंगे
स्वप्ने जरी लया गेली
सण रांधते माऊली. 


कोरोनाच्या संकटात
मन, समाज आजारी
दिवा लावी  कष्टकरी
स्वप्ने उद्याची चंदेरी. 

नका करू नासधूस
द्यावे दान गरिबास
लावू ज्ञानदीप घरी
हिच दिवाळी गोजिरी.



अर्चना  मुरूगकर




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा