आॅफिसमधील दिवाळी (कविता)

 


 दिपावली

दिवे मांडले ओळीत
खास रंग रांगोळीत
जसा मंदिरी भाविक
हर्ष,पावित्र्य मनात. 


भेट प्रेमाची देऊन
जशी माहेरा मैत्रीण. 
देती मंगलकामना
हर्षभरे आलिंगन. 


लाडू फराळ चिवडा
मित्रां संगती भोजन
जसे सुदामा श्रीकृष्ण
होई मोदाचे गुणन. 


भरजरी परिधान
शोभा येतसे सणाची
गाठीभेटी सोहळ्यात
जाण सुंदर नात्यांची. 

काम करू एकोप्याने 
दिवा पेटवू दिव्याने 
असे महत्ता दानात
हास्य फुलवी कुटीत. 



-अर्चना मुरूगकर







टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा