रंगारंग दुनिया (कविता)

 

जाता रंगात रंगूनी
मन जातसे गुंगूनी
रंगारंग दुनियेत
मन जाई हरखूनी. 

येती प्रकाश किरण
सात रंगात बसून, 
जाणतात नेत्र दोन
सृष्टी सौंदर्य पाहून.

रंग निळा आकाशाचा
पित  उत्साही उर्जेचा
रंग तांबडा प्रेमाचा
असे हरित सृष्टीचा. 

खरा निसर्ग रंगारी
नाना ऋतू नाना छटा
रंग दावे दिनभरी
मनोहारी रंगछटा. 

कधी सुख कधी दु:ख
रंग दावती भावना
साऱ्या भावांचे महत्व
असे मनुष्य जीवना.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा