माॅर्निंग वाॅक (कविता)





सभोवती धुक्याची चादर

तप्त लोहगोल डोंगरावर

स्तिमित होऊनी क्षणभर

सहजची जुळती दोन्ही कर


पक्षी करती प्रसन्न किलबिल

जागे होती सकल चराचर

शाश्वत उर्जा पुरवी दिनकर

न्हाऊन निघती वृक्षतरूवर. 


मनुष्यप्राणी गुंग प्रपंची

भ्रमण करी कधी निसर्गाची

अनंतव्यापे जरी जगण्याची

आरोग्य उर्जा देई निसर्गची. 


प्रभातसमयीची ही चक्कर

प्रसन्न पुलकित ठेवी दिनभर. 

तनामनास मिळे बळकटी

नमिता हा सर्वशक्ती भास्कर. 

          अर्चना मुरूगकर.

  



          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा