हिवाळा

 

हिवाळ्यात

थंडगार
मनी भाव 
ऊबदार

तुझा हात
हातामध्ये
लपे दव 
मनामध्ये

रोमांचती
तन मने
गुलाबी या
गारव्याने

डोंगरही
लपलेले
धुके दाट
पांघरले

सूर्य येता
हळू वर
धुके होई
हळू दूर. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा