नवे वर्ष

 



वर्ष नवे उर्जा नवी

चालू नव्या जोमाने 

काही विसरू कालचे

काही आखूया नव्याने


काल गणना वर्षांची

खेळ माणसाचे सारे

उगवत्या सूर्यासवे

रोज नवे उजळावे


नको कालची वेदना

करू उद्याचा संकल्प  

आज दिवस आपला

स्वत: करी कायाकल्प



स्वप्ने पाहू भविष्याची

धावू स्वप्नपूर्तीसाठी

लावू वर्षाला सार्थकी

शुभ भाग्य येण्यासाठी


आणू यशाला खेचून

नवे गुण बाणवूया

नको रडत बसणे

सारे मिळून लढूया. 


अर्चना मुरूगकर🌹












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा