विषाद आतच दडला

 

उद्धव मात्रावृत्त

२/८/४

विषाद आतच दडला


ते शल्य मना मज बोचे

जो प्रमाद तेव्हा घडला

ती स्मृती आजही छळते

तो विषाद आतच दडला


मम हृदयी वेडी आशा

मी तत्वांना त्या जपते

पण नकळत होते तोडत

जे माझे सारे होते. 


मज रीत न कळली तेव्हा

ना भेद कळाला काही

जे सदाच होते सोबत

ते कधीच कळले नाही


मग नित्य दाखवत राही

की नाही घडले काही

त्या अस्पष्ट पटलावरती

मी नवे खरडले काही


मी दगड ठरवले मजला

ना लाड पुरविले मनाचे

जे भाव फुकाचे होते

ते भाग आज जगण्याचे. 


अर्चना मुरूगकर



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा