नमन
अंधारातून नित्य येतसे
एक सूर्य कवडसा
तेजाळण्या वसुंधरेला
घेतला जणू वसा
तेज सुवर्ण लडींचे
गुंफले गोफसुत्र
वरदायी बाप्पा
आशादायी चित्र
जास्वंद फूल आवडीचे
केले मनन पूजन
परागातील लोलकाचे
दिसते गंध छान
वक्रतुंड एकदन्त
बैठक पद्मासन
कृपाप्रसादाने होवो
मंगल मम आराध्याचे दर्शन
गंध शोभे संविधान भक्तीचे
साजरा करू प्रजासत्ताक दिन.
टिळा जाज्वल्य देशप्रेमाचा
बनवूया स्वराज्याचे सुराज्य
गणाधिपती आशिष आम्हा
तिरंग्याची सदैव वाढवू शान.
अर्चना मुरूगकर🙏 🌺
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा