आशा

 अष्टाक्षरी कविता

विषय-आशा

आशेवर चालतसे

जग सारे मनुष्याचे

आज नाही उद्या तरी 

दिस येतील सोन्याचे


आशा दर्शन उर्मीचे

श्रद्धा आणिक भक्तीचे

तिच्या पायी बळ मिळे

जगी श्रमाला शक्तीचे


ढग गडद दाटती

निराशेत काळोखाचे

बुडणाऱ्या गलबता

जग दिसे किनाऱ्याचे


पायी वारकरी चाले

आस अंतरी भेटीची

रोज माऊली चालते

वाट घाईने घराची


आशेवर भविष्याच्या

मायबाप कष्ट करी

वाट पाही लेकराची

अखेरचा श्वास जरी. 


अर्चना मुरूगकर.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा