मन (अष्टाक्षरी रचना)
अष्टाक्षरी रचना
मन
मन गुंतावळ असे
अंतरीच्या विचारांची
थांगपत्ता नसे कोणा
मना तुझ्या गाभाऱ्याची
क्षणी मोदाने उडते
कधी निराश जीवनी
प्रेम, राग, द्वेष, भय
जगण्यात संजीवनी
मन नको तिथे धावे
मन बालक छोटेसे
कसे त्याला आवरावे
मुंग्या सैरावैरा ,जसे
मनी भावना अनेक
जाणिवांचे केंद्रस्थान
विकारांचे जन्मस्थान
कर्तृत्वाचे मर्मस्थान
मन करावे व्यापक
जागवावे चेतनेला
बांधू स्वतः च्या मनाला
आठवूनी संयमाला
अर्चना मुरूगकर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा