Ganesh
दावी बीज आधार
'ऊ'कार असे शुंड
जसे भक्ती मूळ खोलवर
'म'कार गंध शोभे
वाढता अंकुर भूवर
आद्यप्रणव रूपात
महत्व बीजांकुरणाचे
महत्व पुनरुत्पादनाचे
रूप शोभे लंबशुंडाचे
नमन सुप्रभाती असे
पितउर्जा प्रदात्या रवीला
भक्तीमळा हिरवा फुलवी
ओंकाररूपी बीजाक्षराला
त्र्यक्षर असे आद्य प्रणव
ब्रह्मा विष्णू महेशाचे रुप
वेदातील ऋचांचे आधार
बीजरूप दावी स्व स्वरूप
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा