लेखणी
अष्टाक्षरी कविता
लेखणी
दिली लेखणी मजला
पालकांनी आनंदाने
स्वप्ने करण्या साजरी
मिरवते ताकदीने
तिचे जाणावे महत्व
नको बेगडी लेखन
घडो संवाद मनाचे
उघडावे अंतर्मन
घडे इतिहास काल
परतंत्र राज्यामध्ये
असे प्रखर अंजन
लोकशाही राष्ट्रामध्ये
व्हावी स्वतंत्र लेखणी
नको गुलाम कुणाची
असो आवाज बुलंद
नको सत्तेची धनाची
लेखनीने उमगली
धरा साऱ्या संस्कृतीची
कधी अन्याय कुनिती
बोध वचने संतांची.
जसा सूर्यदेव जगी
असे प्रज्वल प्रखर
तशी विवेकी लेखणी
तळपते धारदार.
अर्चना मुरूगकर🙏🌺
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा