अष्टाक्षरी कविता-वसंत ऋतू

 




अष्टाक्षरी कविता

शिर्षक- वसंत ऋतू


अविरत चाले चक्र 

होती ऋतूंचे बदल

नित्य नूतनच भासे

सृष्टीमाता सभोताल


करे वारा मनमानी

गारठ्याला कंटाळून

मंद सुगंध लेवूनी

मोहरले आम्रवन


राजा ऋतूंचा वसंत

नव पल्लव भूवर

नव्या आशेची पालवी

फुले चराचरावर


पित पुष्प बहरले

तन-मन आनंदात

मन तरुणाई नाचे

सृष्टी सौंदर्य भरात


कुहूकुहू थुईथुई

चाले गायन नर्तन

सळसळ किलबिल

फुलतसे पानपान


अर्चना मुरूगकर🌹



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा