अलगद


 




अलगद

बाळ दुडूदुडू येई वेगाने

पहात मातेकडे आशेने

हात पसरूनी उभी माता

अलगद उचलून घेई मायेने


दुखावणारे मन कळे प्रेयसीचे

हळूच फुंकर घाली प्रेमाने

घेतसे आरोप सारे स्वतःवर

अलगद टिपतसे अश्रू काळजीने


फुलला मोगरा पानोपानी

लगडली वेल पुष्पभाराने

हळूवार वेचूनी भारावे सुगंधाने

अलगद घेई ओंजळीत कौतुकाने


फुलपाखरू उडते फुलाफुलांवर

पाहून त्याला मन होई आनंदी

नाजूक रंगित फुलासम काया

अलगद टिपतसे मधुपर्क निवडूनी


मन झाकोळते जेव्हा काळजीने

संकटे घेरतात सर्व बाजूंनी

चक्रव्यूहासम भासे जग अबोध कोडे

अलगद येई कुणी देवदूत होऊनी

अर्चना मुरूगकर🌹



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा