मराठी राजभाषा दिन

 

मराठी राजभाषादिन

पडे कानावर माझ्या

भाषा आईच्या तोंडून

असे सोपे आकलन

ज्यात प्रेमाचे शिंपण


झालो ऐकत सुजाण

श्लोक भारूडे किर्तन

खेळ खेळता अंगणी

होई सहज शिक्षण


कधी बेगडी फुलात

होई मन सुगंधित? 

व्यक्त भावना होण्यास

बोला मातीच्या भाषेत


कळे सभ्यता संस्कृती  

माझ्या मुलुखाची मला

माझ्या मातीचे सोहळे

 ज्ञान सारे देती मला


पोसू पिंड ज्ञानरूपी

मराठीच्या दुधावर

तिचा भक्कम आधार

जग पाहू दूरवर


धन्य शिरवाडकर

केली मराठी जतन

अभिमान मनी धरू

सण राजभाषा दिन


अर्चना मुरूगकर🙏🌺









टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा