विज्ञान दिवस


 विज्ञान दिवस


कोडे मनुष्य मनाला

पडे सदैव सृष्टीचे 

जाणू काय कोठे कसे 

सप्रमाण विज्ञानाचे


बनू कृतज्ञ थोरांचे

दिल्या सुविधा जगाला

गती दिली जीवनाला

नव्या रिती जगण्याला


नका बनू अंधश्रद्ध

नाना शास्त्रे पडताळू 

अहोरात्र संशोधन

रोग लागतील पळू


करू विवेक पालन 

करू मानव्य रक्षण

शस्त्र अस्त्र संशोधन

नको शक्ती प्रदर्शन


दूरगामी धोरणाने

करू रक्षण सृष्टीचे 

देऊ लेकरांना उद्या

वाण सुंदर धरेचे


श्रेष्ठ शास्त्रज्ञ रामन

करू शोधाचे स्मरण

देऊ विज्ञान वारसा

वैज्ञानिक दृष्टिकोन


 अर्चना मुरूगकर🌹

तळेगाव दाभाडे. 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा