कविता कवितेची

 



कवितेचीही कविता असते

शब्दालंकारे सुंदर नटते

मिटून ठेवलेल्या ओठांमधले

भाव सारे सहजच उलगडते


कधी विद्रोही धगधगती

जसे कोळसे आहारावरती

श्रीकृष्णाच्या बासरीचे

सुरेल सूर गिती गवसती 


कधी नावरे हुंदके आतील

माय वासरू जसे भेटती

कधी मोदाची ये ललकारी

सर्वांगी वसंत सृष्टी बहरती


निसर्ग पाडी भुरळ मनाला

जसा प्रियकर प्रेयसीला

पाऊसवारा वीज कडकडे

भयभीत भाव तिचा आतला


शूरवीरांची गाथा सांगती

पोवाडे भारदस्त समाजी

जशी गर्जना मेघाची हो

रोमांच अंगावर येती सहजी


रडगाणे नी हास्यतराणे

धबधबा रिक्त होणारा

ओव्या अभंग ज्ञानाच्या

लावणी दर्शवे हळूच शृंगारा. 

अर्चना मुरूगकर🌹



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा