क्षुधा (मुक्तछंद कविता)




 नविन आशा मनाची


कधी लोकांना भेटण्याची


नवीन कपडे, पुस्तके


जत्रेमधल्या लहान मुलाची




भूक असे मीलनाची


अन्नाची अन् पाण्याची


न संपणारी कधीही


साांगता समाधानाची




मन असे केंद्र क्षुधेचे


अनेक आशा लालसांचे


मन असे लगाम विवेकाचे


न बनू देण्या वखवखीचे




हव्यास क्षुधेचा तामसी


बनवी रावण जगात


 मर्यादा देई देवत्व


 मानवा पुरूषोत्तम जगात

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा