Ganesha
रंगीत बाप्पा आत विराजे
केशिकांच्या जाळीमध्ये
वरदमूर्ती अलंकृत साजे
नभनिलीमा सुमुख सजले
अंग माखले पळसरंगी
प्रेमगुलाबी शेला ल्याले
कसूनी पितांबर हरितरंगी
तोडे अंगठ्या पैंजण
कर्णअलंकार गुंजनयन
रक्तवर्ण शिवगंध भाळी
मयूरपंखी सोंड शोभायमान
नयन देखती नवा सोहळा
सृष्टी ल्याली पुष्पबहार
नानारंगे नटू दे जीवन
रंगवर्षा आशिष भक्तांवर
होळी खेळून आले गणेश.
मोदक खाऊन खेळाचा
वाढला जोश व आवेश.
या श्री दर्शनाने भक्त
करिती रंगात जल्लोष.
रमेश मुरूगकर.
ओंकार रूपी गणेश
अ चे बने मस्तिष्क शरीर
उ ची लांब सोंड सुंदर
म आकाशी तेजज्योत गगनावर
म मराठी मातेचा
म मराठी भाषेचा
भक्तीपताका लहरती
दिन मराठी गौरवाचा
अर्चना मुरूगकर 🙏🚩🌺
बाप्पा आज काष्ठ शिल्पाचे
भस्मगंध त्रिपुंडी शिवपुत्राचे
चंदनासम आशिष विघ्नहराचे
चांदणे पसरवी शितलतेचे
अभक्ती दूर करत सश्रद्धाचे
सदैव विद्याधिपती आशिषाचे
आयुष्य बनो किर्तीगंधाचे
चदनासम झिजत कर्तव्यकार्याचे.
अर्चना मुरूगकर🙏 🌺
भौम असे बाळ पृथ्वीचा
अंगारक लाल रंगात
केला गणेश मंत्र जाप
सहस्त्र वर्षे रत तपात
सुदिन आज तपश्चर्या प्राप्तीचा
लाभले पूण्यस्थान विश्वात
चतुर्थीस अंगारकी नाम प्राप्त
भक्त रमले गणेश पूजनात
दिन असे विशेष आज
उपवासे फल प्राप्त हो खास
२१चतुर्थींचे फळ अंगारकीस
विघ्ने दूर सरती भजता मंगळास
दर्शन मंगलमय सुप्रभातीचे
विश्व भारले गणेशलहरींनी
मंदस्वर मन मंदिरात गर्जे
तेजाचे पूजन रवीकिरणांनी.
अर्चना मुरूगकर🙏🌹
रवी किरणांचे नृत्य चालले भूवरी
पांढरी तेजरेषा वळे वळणावरी
पिवळा मोदक शोभतो वरदाच्या करी
निरखून पहातसे वळवूनी सोंड
बुद्धीसागराचे सुक्ष्म अवलोकन
उर्जादायी सकाळ प्रसन्न दर्शन
सहज सोपे बनतसे अध्यात्मज्ञान
अर्चना मुरूगकर🙏🌹
ओंकाराच्या आकारात बैठक गणेशाची
ऊकारात दिसती सुमुख लंबशुंड
गंध सूर्यतेजस्वी बाप्पाच्या लल्लाटी
सोहम ज्ञान मिळे दूर सरे भयगंड
अर्चना मुरूगकर 🙏🌺
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा