जाणता राजा
आई शिवाई गर्जली
जिजाईच्या वेदनेने
पिंड पोसला बाळाचा
अन्यायाच्या संतापाने
केले पोषण धीराने
गोष्टी सांगत वीरांच्या
मित्र मावळे सोबती
देव घडला न्यायाचा
तळपली तलवार
केले मुलूख काबिज
केली किल्ल्यांची बांधणी
जिंके शत्रू कावेबाज
वीर योद्धा रणावर
होते सोबती जीवाचे
केले स्थापन स्वराज्य
स्थापी आदर्श युगांचे
छत्रपती शिवा होता
खरा रयतेचा राजा
दिले स्त्रियांना अभय
खऱ्या गुन्ह्याला सजा
रात्रंदिन एक केले
अंगी तेज भवानीचे
राज्य एका संन्याशाचे
जगी जाणत्या राजाचे
अर्चना मुरूगकर🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा