चिवचिव चिमणी
चिवचिव चिमणी दारात येते
चिवचिवाटाने आनंद देते
पळवून लावते सारा थकवा
किणकिण आनंदी मन बनते
कोमल रूप तिचे इवलेसे
कार्य करी स्वच्छतादूताचे
स्थान विशाल सृष्टीत असे
प्राणीरूपी वैविध्याचे
झाडे पाने तिच्या हक्काचे
जसे घरकुल तुझे सुखाचे
कापून झाडे नका करू बेघर
हरवेल तिचे घर बापडीचे
'कोणाही जीवाचा न घडो मत्सर'
हे तत्व सदा जप मनाशी
मुक्या जीवांचे कर रक्षण
नको बनूस मनुजा आधाशी
नको बनवूस उजाड धरा
जप मंत्र पुनरुज्जीवनाचे
नांदतील सारे जीव सुखाने
गोकुळ हसेल हिरव्या धरेचे
गोळा होतील चिमण्या साऱ्या
पुन्हा चिवचिवाट होई खिडकीत
जाणून महत्व कर रक्षण माणसा
बुद्धिमान तूच साऱ्या सृष्टीत.
अर्चना मुरूगकर🙏🌹
ं
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा