सरळ माणसा

 


हरिभगिनी 8/8/8/6

फटका

सरळ माणसा


सरळ माणसा लोकशाहीत घरात भिऊन बसू नको

झगमगणाऱ्या दुनियेमध्ये उगाच मागे लपू नको

तुझीच ताकद उमजू देरे नव्यानेही तुला जरा

चमचमणाऱ्या ताऱ्यांमध्ये अवस चंद्रमा बनू नको


अंतर पहा तू स्वतः स्वतःचे इतरांवर तू 

रुसू नको

लपलेल्या त्या ज्वालामुखीस कोंडून आत बसू नको

कतृत्वाच्या कार्या तुझ्या मिरवायाला भिऊ नको

धगधग सारी विझूवून आत प्रेतासम तू जगू नको


खांद्यावरती सहज पेलसी ओझ्याचे ते भार सदा

अभिमानाने मिरव स्वतःला हीनत्वाने जगू नको

दागिण्यासम जबाबदारी अंगी शोभे नित तुझ्या

फळ कष्टाचे चाखत जगशी कशापुढेही झुकू नको


गण तंत्राचा आधारच तू डळमळीत मग बनू नको

तुझ्या हाती सत्ता सारी वेडा बनूण फिरू नको

कळपामधील मेंढी बनूण अंधभक्त तू बनू नको

 वापरकर्त्या नेत्यापुढती झुकून खाली दबू नको


पारध्याला देती शिकवण पक्ष्यांना त्या स्मरू जरा

एकीने या जगी जगता सत्ताधाऱ्या भिऊ नको

पाझर फोडी पत्थरासही भगीरथाला आठव तू

मतदानाचा हक्क बजावत राजा होण्या भिऊ नको

अर्चना मुरूगकर, 

तळेगाव दाभाडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा