कोरोना

 

कोरोना


कोरोना
आला परदेशातून
फिरतो गल्ली बाजारातून
पसरला सर्वत्र वेगाने गावागावातून
कोरोना
चालत नाही
स्वत:च पळत नाही
माध्यम पुरवतो तुम्ही आम्ही.
कोरोना
कळली आरोग्य स्वच्छता
दाखवली आपलीच अस्वच्छता
ब्रीद मानून पाळावी समाज स्वच्छता


कोरोना
ठरला बाधाच
म्हाताऱ्या अशक्तांचा वैरीच
थैमान मृत्यूचे जणु प्रलयच.
कोरोना 
परिणाम सर्वत्र
गमावले रोजगार मात्र
नव्या संधीसाठी भटकती इतरत्र
कोरोना
अभूतपूर्व दृश्य
थांबले जग पुतळ्यासदृश्य
झाली सारी गर्दी अदृश्य
कोरोना
थोड्याशा निष्काळजीने
हाहाकार वाढे नव्याने
जरी चुणूक दाखवली यमाने. 
अर्चना मुरूगकर🌹
तळेगाव दाभाडे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा