प्रभातभक्ती
तिमिरातूनी तेजाकडे
बाप्पा तेजकिरणांचे
अज्ञानातून ज्ञानाकडे
रुप विशाल ज्ञानचक्षूंचे
तृतीय नेत्र उघडलेले
ज्ञानकेंद्र सुवर्णसूर्याचे
लावला बुक्का वैष्णवगंध
बीजेचे दर्शन तुकोबाचे
अभंग तरले इंद्रायणी
जसे शुद्धज्ञान सवंग जीवनी
क्षमाशील संतसूर्य तळपले
अज्ञानगुह्य समाजजीवनी
झडो कलंक आम्हा मतीचे
बाप्पा भक्तीची तेज आभा
संतकाव्य सदा तळपतसे
अक्षर अभंग जशी सूर्यप्रभा
अर्चना मुरूगकर🙏🌹
निळाई व्यापली सर्वत्र
पितरंग उजळे रवीचा
वक्रतुण्ड वरदहस्तात
बाप्पा दिसे अंतरीचा
रंग रंगी रंगले बाप्पा
पसरला सर्वत्र भक्ती रंग
होऊ दे वर्षाव रंगांचा
सारे आज रंगांत दंग
अर्चना मुरूगकर🙏🌹
अंगणी गोमय सडा
प्रात:काळी प्रसन्न
रेखले ठिपके ओळीने
प्रगटले चतुर्भुज गजानन
रंग भरले आवडीचे
मळवट लाल भाळी
हळदीने माखले अंग
गुलाबी हस्त पुष्पकळी
अलंकार सुवर्णाचे
धारदार परशू हाती
हिरेजडीत मुकूट
शेंदूरमंडित मुखावरती
हरित पितांबर कटीस
जरीकाठ शोभे पिवळा
जानवे रुळे अंगावर
शैवगंध रेखले भाळा
खाद्य कळीदार मोदक
शोभे लंबोदर हातात
आखलेल्या रांगोळीसम
सप्तरंग फुलू दे जीवनात
अर्चना मुरूगकर🙏🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा