कोंदण
कोंदण
ऊब माहेरची माया
शोभे लेक हिरा छान
फुले लेकीचे जीवन
त्यांच्या मायेचे कोंदण
तुझे असीम सौंदर्य
गाली हसू किणकिण
रानझरा धून दूर
शोभे लाजेचे कोंदण
तुझे नाजूक शरीर
खोप्यातील सुगरण
कणखर बाणा तुझा
स्वसंरक्षणाचे कोंदण
तुझे त्याच्यावर प्रेम
धाग्यातील घट्ट वीण
बांधी मुक्त प्रेमा त्याच्या
तुझ्या मनाचे कोंदण
माय हळवी तुझ्यात
सदा मुलाचे रक्षण
तुझ्या नितीनियमाने
त्याला शिस्तीचे कोंदण
समाजाच्या रितीभाती
त्याचे उमटे गोंदण
जरी रुपाला बंधने
साजे व्यक्तित्व कोंदण
ऊब माहेरची माया
फुले लेकीचे जीवन
शोभे लेक हिरा त्यात
त्यांच्या मायेचे कोंदण
नव्या युगाचे कपडे
नाही नऊवारी लेणं
जपे विचार वारसा
त्यात संस्कृती कोंदण
अर्चना मुरूगकर🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा