चंद्रकांता मात्रा वृत्त 8+8+8+2 झोपच हरली गं
चंद्रकांता मात्रा वृत्त
8+8+8+2
झोपच हरली गं
रूप देखणे, मस्त चालणे ,सुंदर मुखडा ,गं.
भूक हरपली, तहान हरपे,बघतो वेडा ,गं.
डौल तुझा रे, प्रिया साजणा,बघते वेडी , ही
वेष भरजरी, ऐटच भारी, राजस मूर्ती, ही.
केस भुरभुरू, हसणे किणकिण,मला भेटली, तू
जाता जाता, हळूच वळून, लाज लाजली, तू
स्वप्न सख्या रे, नकळत माझे, हृदय चोरले ,तू
भाव मुके ते, माझे अंतर, कसे वाचले, तू?
स्वप्न सुंदरी, पाहून तुला, झोपच हरली, गं
रूपयौवना, तव प्रेमाने, स्वप्ने सजली, गं.
अर्चना मुरूगकर🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा