कोरोना
हरलोय आज आपण
विसरलास तू आज नक्की
कधी रहात होतास जंगलात
संघर्षाचे रोजचे जीवन
उद्याची होती तुला भ्रांत
साधने काय कामाची
जगणेच आज संपले तर
रात्र संपून येते सकाळ
वाग जरा धरुन धीर
जिंकलाय तो करोना
हरलोय आज आपण
पुन्हा एकदा लाॅकडाऊनचे
करावे लागते नियोजन
पाहून थोडा हलगर्जीपणा
काढले त्याने डोके वर
जगता येणार नाही मानवा
पुन्हा जीवनच संपल्यावर
आज अडकलोय आपण
महामारीच्या मध्यावर
गरीब-श्रीमंत, चोर-साव
सारेच समान करोनासमोर
भार वाहतोस डोक्यावर
आधार संसाराला तुझा
डोकेच उरले नाही तर
मिळणार नाही घरच्यांना दूजा
शत्रूची पाहून रीत सारी
ठरवावा आपला गनिमी कावा
नमवून त्यास साऱ्या मार्गे
यशस्वीपणा पुन्हा गावा.
अर्चना मुरूगकर🙏 🌹
हरलोय आज आपण
जंगलामध्ये होतास माणसा
प्राण्यासारखा प्राणीच तू
संघर्षाचे होते जीवन
अन्न रोज शोधायचास तू
साधने काय कामाची
जगणेच आज संपले तर
रात्र संपून येते सकाळ
वाग जरा धरुन धीर
जिंकलाय तो करोना
हरलोय आज आपण
पुन्हा एकदा लाॅकडाऊनचे
करावे लागते नियोजन
पाहून थोडा हलगर्जीपणा
काढले त्याने डोके वर
जगता येणार नाही मानवा
पुन्हा जीवनच संपल्यावर
आज अडकलोय आपण
महामारीच्या मध्यावर
गरीब-श्रीमंत, चोर-साव
सारेच समान करोनासमोर
तुझे तूच ठरव आता
खरेच का नियम पाळायचे ?
घरच्यांनी तुझ्यासोबत जगायचे
की तुझ्यासाठी अश्रू गाळायचे
शत्रूची पाहून रीत सारी
ठरवावा आपला गनिमी कावा
नमवून त्यास साऱ्या मार्गे
यशस्वीपणा पुन्हा गावा.
अर्चना मुरूगकर🙏 🌹
आगीहून वेगे |पसरे कोरोना|
कुणाला कळेना| उपायच|
कोरोना साथीने |विश्वच बेजार|
स्थित व्यवहार| समाजाचे|
सुने झाले घर |मरे ज्याचा आप्त|
साथीच्या खाईत| जाणा काळ|
जपावे स्वत:ला| स्वत:च्या घराला|
त्यातून जगाला| स्वच्छतेने|
वापरावा मास्क |पाळावे अंतर|
ठेवील अंतर |कोरोनाही|
रोगाणूरोधक| टाकू हातावर |
रोगा ठेवी दूर |निरंतर|
असावा चौरस |आहार आपला|
फळे भाजीपाला| जेवणात|
करावा प्रसार |सुयोग्य मार्गांचा|
नको कलहाची| अज्ञदेशी|
जाणूनिया मार्ग| समाज हिताचे|
करावा प्रसार| लसीचाही|
साऱ्या अंधश्रद्धा |फिटवावे भ्रम|
योगा प्राणायाम| नित्य साधा|
केले हद्दपार |देवी पोलिओस|
मारू कोरोनास |निर्धाराने|
अर्चना मुरूगकर🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा