आले भरून आभाळ

 

छंदरचना उपक्रम-१कविता-१

अष्टाक्षरी


आले आभाळ भरुन


बाप राबे शेतामध्ये

करी रोज मशागत

काटेकुटे उचलूनी

करी रान लोण्यागत


आत बाहेर उन्हाळा

मन सोडते उसासे

वर नजर आभाळी

दृष्टी चातकाची भासे


आले आभाळ भरुन

मन हरखून जाई

कुठं बघू कुठं न्हाई

जीव हलकासा होई


भोवताल अंधारला

येई झुळूक वाऱ्याची

फुटे सुखद फुलोरा

गत नाचऱ्या मोराची


फुटे आशेला पालवी

लगबग चाले रानी

स्वप्ने डोळ्यात हिरवी

माय बनतसे राणी. 


सौ. अर्चना रमेश मुरुगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा