बालानंद मात्रावृत्त कविता


 बालानंद

मात्रा ८+६

लाट कोरोनाची


भयाण शांती आज उरे

दुकान घरही बंद पडे

कोरोना च्या लाटेने

बाजारपेठ ओस पडे


हल्ल्याने या जंतूच्या

सारेच पितळ उघड पडे

साव बनूणी चोर फिरे

व्यवस्थांचे धिंडवडे


मानव सारा फिका पडे

सुक्ष्मजीव हा चढा ठरे

अनुकूलन या शक्तीने

रूप बदलून पुन्हा उरे


समाजशक्ती ढासळली

राजसत्ता कोसळली  

झाले बंदी माणसेच

कोरोनाने खचलेली


भय काळाचे जाणावे

उगा बाहेर न पडावे

संक्रमणाच्या शृंखलेस

तोडत इथेच गाडावे


अर्चना मुरूगकर🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा