कविता (पादाकुलक)

 


पादाकुलक
८+८
गरिबा घरचे स्वागत सुंदर

लखलख भांडे, शीतल पाणी
गरिबा घरचे, स्वागत सुंदर
नाहीच जरी, अत्तरदाणी
सुहास्य वदने, वचने मधूर

आसनी नसे, चंदनी पाट
ऊन घोंगडी,बाजेवरती
कारभारीन,शंकर भोळा
कर जोडूनी, स्वागत करिती

मनापासून ,करिती आग्रह
पानात जरी, कांदा भाकर
आपुलकीच्या, गप्पागोष्टी
संतोषाने,येई ढेकर

शिष्टाचारी ,नच अवडंबर
सुबोध वाणी , साधे विचार
अहंपणाचा नाही वारा
इथेच दिसती, खरे संस्कार

अर्चना मुरूगकर🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा