बालानंद

 बालानंद वृत्त

(८+६) 

दिवस सारेच, मौजचे


सोनपरीच्या ,वेशाचे

अल्लड वय हे,वळणाचे

प्रेमाची ही ,नसे उमज

हसरे कप्पे ,जीवनाचे


रंग मनाचे, मोहरले

उरात गाणे, बावरले

इंद्रधनूच्या, रंगांचे

कैक धुमारे, फुटलेले


निर्झर अवखळ, वेगाचा

उत्साहाने ,शुभ्र हसे

जल बिंदूंना,उडणाऱ्या

अलगद पेरत, जात असे


दिवस सारेच, मौजेचे

प्रगतीच्या नव, आशेचे

बंध तोडून, पळण्याचे

फसवे मृगजळ, भासाचे

अर्चना मुरूगकर🌹


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा