पादाकुलक (८+८) विदीर्ण मने
पादाकुलक (८+८)
विदीर्ण मने
उगा आठवण तुझी पुन्हा रे
उदास होई सांज सावळी
आर्त वेदना चिरत जातसे
भासांची मग बने साखळी
कृष्णासंगे प्रेमापायी
वेडी बनली ,राधाराणी
गोकुळ प्रांती, वेशीवरती
मागे ठेवी, सारी गाणी
अनुभूतीच्या झोक्यावरती
स्पर्श मनाचे मनास कळती
अंतर बिंतर सारे खोटे
क्षणात सारे भाव समजती
प्रेम आपले, चिरतरुण हे
गाई गाणी, सुखद क्षणांची
फिकीर त्याला, नसे कधीही
दुरावलेल्या, त्या जगतांची
कुढण्याचेही दिवस संपले
नवीन नाती नवे तराणे
जीवनमार्गी फुले फुलोरा
लपवत जावी, विदीर्ण मने.
अर्चना मुरूगकर 🙏🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा