उदास वाटे रे

 




8+8+8+2) चंद्रकांता

उदास वाटे रे


पाहून तुला  दिवस लोटले मनास लागे रे

आठवणींच्या चित्रफितीने  उदास वाटे रे


राणी माझी उदास गल्ल्या उदास वाटा गं

भक्तच नसता राऊळ सुने उदास वाटा गं


चोरुन बघशी हळूच मजला माझी राधा गं

नेत्र कटाक्षे फुलून येती साऱ्या बागा गं


कृष्णसावळ्या अंत पहातो उगाच माझा तू? 

 दूराव्याने नकोस घेऊ प्राणच माझे तू? 


सखेसाजणे पहा जराशी तुझ्यासंगे मी

हृदयकंपने जपे उराशी श्वासासंगे मी


अर्चना मुरुगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा