इप्सित सारे त्याला मिळते

 लवंगलता ८+८+८+४

इप्सित सारे त्याला मिळते



रात्रीला जो घाबरला तो कधीच उठला नाही

स्वप्न पाहतो जो दिवसाचे कधीच निजला नाही


संघर्षाला टाळत जातो कधीच घडला नाही

त्यानंतर ते पिकती मोती त्याला कळले नाही


संकटसमयी खचला नाही धैर्याने जो लढतो

दिस सोनेरी झळाळणारे तोच यशाचे बघतो


घाव घणाचे सोसत जगण्या असे तयारी ज्याची

यशस्वितेच्या माळेने मग होई तृप्तता त्याची


मानवतेच्या कठीण मार्गे जो चालत जाई

द्वेषाचे मग जहाल विष ते नच वाट्याला येई


आत्मविश्वास ज्याच्या अंगी कष्टास घाबरत नाही

दिन सौख्याचे तोच पाहतो यशात डुंबत राही


मूल्य जपूनी सराव  करतो मैदानावर खेळत

निखळ आनंद साफल्याचा राही त्यांच्या सोबत


अभ्यास गिरवतो एकाग्रचित्ती निष्ठेने जो प्रार्थी

इप्सित सारे त्याला मिळते टळे पसारा स्वार्थी



अर्चना मुरुगकर🙏🥀


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा