भातुकली

 




भातुकली

बालपणीची भातुकली

आजही वाटते छान

भांडी होती पिटुकली

 नव्हते कसले ताण


साग्रसंगीत बने स्वैपाक

पोळी -भाजी, भात-वरण

भरभरुन आग्रह करताना

सोप्पे होते बनवणे पूरण


क्षणात बने मी बाबा

तर क्षणात बने आई

नव्हता बडगा नोकरीचा

तोरा मिरवण्याची असे घाई


सोप्पे होते डॉक्टर बनणे

नर्स होण्यात नव्हता कमीपणा

शिक्षक बनूण शिक्षा करणे

हाच असे शिक्षकी बाणा


रुसून परत जाता येई

सोडून खेळ अर्ध्यावर

जमत नाही मुळीच आता

 चक्रव्यूहात अडकल्यावर


मिळेल ती नोकरी बरी

जीवन फूलपंखी संपले आता

खळ्यावरचे बैल बनलो

कर्तव्य पार पाडता पाडता


अर्चना मुरूगकर🙏 🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा