अष्टाक्षरी
अष्टाक्षरी उपक्रम
विषय-मनी चांदणे हसावे
येई मृगाचा पाऊस
सृष्टी भिजली वर्षाने
तन मन सुगंधित
नाचे मोर आनंदाने
कन्या नांदते सासरी
साही कठोर बोलणे
भेट माऊलीची होता
गाली स्मिताचे चांदणे
बाळ रडते आकांती
उरी घेऊनी पाजावे
तृप्त नजर पाहून
मनी चांदणे हसावे
जीव विरही जळतो
मन लागेना कशात
तिच्या पुसट भासाने
खुशी मावेना उरात
वृध्द माता ताटकळे
आस मुलाच्या भेटीची
त्याला पाहूनी पुढ्यात
हर सुरकुती हसे
सदा कष्टाचा डोंगर
जसे चटके उन्हाचे
त्याच्या धीराच्या साथीने
दिस छायेत राणीचे
बाळ पाळणाघरात
आई येई परतूनी
तिची चाहूल लागता
बाळ जाई आनंदूनी
मनी लाख स्वप्नदिवे
बाप कर्जात बुडाला
मिळे सहाय्य शिक्षणा
हर्ष होई बालकाला
सैनिकाच्या कुटुंबाच्या
नसे आनंदाला थारा
खूप दिसांनी पहाता
हसू आसू वाहे झरा
सज्जनांच्या मनामध्ये
सदा भाव कल्याणाचे
होई आनंदी अंतर
सुख पाहूनी जगाचे
अर्चना मुरूगकर🙏🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा