तुझ्यात देव दिसला
८+८+४
वंशमणी मात्रा वृत्त
तुझ्यात देव दिसला
कोरोनाचे आहे आता दडपण
पेटलेलेच दिसते आहे स्मशान
लोकांसाठी कुठे जीवनच अर्पण
वडिलच करती पोरासाठी तर्पण
स्तब्धच आहे सारे आता शिक्षण
कळले आता जीवनच खरे शिक्षण
कंठाशी बघ आले सारे प्राणच
श्रेष्ठत्व तुझे नाही आता मानच
विश्वासाच्या भावाने रे जग तू
सामर्थ्याचे सोने कर रे मग तू
अहंपणाची झूल सोड तू आता
पराधीनत्व मान स्वत:चे आता
फक्त मानवा तुझ्यात देव दिसला
गरजवंतास तोच कामी आला
अर्चना मुरुगकर🙏🥀
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा