पोस्ट्स
मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
महाभक्त श्रीरामाचा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभक्त श्रीरामाचा दास रामाचा मारूती रूप निस्सीम भक्तीचे महावीर महाबली रूप अजेय शक्तीचे हनुवटी भेदे वज्र शोभे नाम हनुमान पुत्र वायूचा चपळ जाणे संगित विद्वान देव साऱ्याच गावाचा असे लाडका बाळांचा जन्मताच ताम्रमुख शोभे प्रमुख कपिंचा गुण निरीच्छ वृत्तीचा महाभक्त श्रीरामाचा ठाई ठाई शोधे राम दूत नरेश रामाचा घ्यावा चापल्याचा गुण करू बळाची साधना असे गदाधारी वीर बांधी वाईट शक्तींना अर्चना मुरूगकर
अक्षय गाथा या राष्ट्राची
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पादाकुलक ८+८ अक्षय गाथा या राष्ट्राची कणखर भूमी सांगे महती शूरवीर अन पराक्रमाची इतिहास असे सुवर्णाक्षरी अक्षय गाथा या राष्ट्राची धरा असे ही पुराणकालिन नगर सांगती कथा कुळांच्या देव नांदले याच धरेवर विठुमाऊली अन संतांच्या छत्रपतींच्या साम्राज्याचा मुलूख विजयी अभिमानाचा झेंडा लहरे स्वातंत्र्याचा नेत्यांचा नी सुधारकांचा भारतरत्ने शान आमुची कलाक्रीडेत दिसे निपुणता साहित्याचा होई आदर *गौरव होवो सदा वाढता* अर्चना मुरूगकर