अक्षय गाथा या राष्ट्राची
पादाकुलक
८+८
अक्षय गाथा या राष्ट्राची
कणखर भूमी सांगे महती
शूरवीर अन पराक्रमाची
इतिहास असे सुवर्णाक्षरी
अक्षय गाथा या राष्ट्राची
धरा असे ही पुराणकालिन
नगर सांगती कथा कुळांच्या
देव नांदले याच धरेवर
विठुमाऊली अन संतांच्या
छत्रपतींच्या साम्राज्याचा
मुलूख विजयी अभिमानाचा
झेंडा लहरे स्वातंत्र्याचा
नेत्यांचा नी सुधारकांचा
भारतरत्ने शान आमुची
कलाक्रीडेत दिसे निपुणता
साहित्याचा होई आदर
*गौरव होवो सदा वाढता*
अर्चना मुरूगकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा