महाभक्त श्रीरामाचा
महाभक्त श्रीरामाचा
दास रामाचा मारूती
रूप निस्सीम भक्तीचे
महावीर महाबली
रूप अजेय शक्तीचे
हनुवटी भेदे वज्र
शोभे नाम हनुमान
पुत्र वायूचा चपळ
जाणे संगित विद्वान
देव साऱ्याच गावाचा
असे लाडका बाळांचा
जन्मताच ताम्रमुख
शोभे प्रमुख कपिंचा
गुण निरीच्छ वृत्तीचा
महाभक्त श्रीरामाचा
ठाई ठाई शोधे राम
दूत नरेश रामाचा
घ्यावा चापल्याचा गुण
करू बळाची साधना
असे गदाधारी वीर
बांधी वाईट शक्तींना
अर्चना मुरूगकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा