फटका

 ४/५/२१

   



👍👍 हरिभगिनी फटका (८+८+८+६) 


अविचाराचे ठसे नको

मर्त्य माणसा प्राणी तूही टाळून हेच जगू नको

उगाच साऱ्या जगतामध्ये तोरा मिरवत फिरू नको


धडा शिकवला कोरोनाने विसरू जाई फसू नको

सुख सोयीचे जीवन जगता राजा बनून बसू नको


घेता घेता घेतच जासी देताना तू रडू नको

झाडे प्राणी संपवतो तू जमिनीला ही भक्षू नको


स्वर्ग घराचे बनवत जाता वसुंधरेला नडू नको

प्रदूषणाच्या विषास पेरत तोंडावर तू पडू नको


बुद्धिमान तू लोभाने मग हतबल पामर बनू नको

उद्यास देण्या जतन करावे अविचाराचे ठसे नको. 


अर्चना मुरूगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा