सुखद शहारा (वंशमणी मात्रा वृत्त) ख

 




सुखद शहारा


काळे काळे ढग आभाळी आले

जलद जलाचे भरले ओले ओले

मनास स्पर्शे थंडाव्याचा वारा

आता वाटे दिवस हवेसे आले


झोके घेती झाडे वेली  हलती

गिरक्या घेती  सुकली पाने फिरती

घूंघूं वारा  भीती  मनास आणे

खिडकी मधुनी भित्रे डोळे बघती


कडकड गडगड वीज चमकते वरती

प्राणी पक्षी किलबिल गलका करती

विस्मय सारा डोळ्यामध्ये दाटे

भरून जाई जल नक्षीने धरती


थेंब टपोरे वेगेवेगे  पडती

एक आगळा सुवास पसरे माती

ऋतुबदलाने सुखद शहारा येई

आनंदाने सारे गाणे गाती. 


अर्चना मुरूगकर









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा