मेनका (गझल) गालगागा गालगागा गालगा




 मेनका (गझल) 

गालगागा गालगागा गालगा


देशसारा झोपताना पाहिले

सैनिकाला जागताना पाहिले


शिक्षकांना पूजताना पाहतो

ज्ञानपुष्पे वेचताना पाहिले


मोठमोठ्या बक्षिसाचे सोहळे

कष्टणारे राबताना पाहिले


मातृशक्ती वंदनाला जाणतो

त्यागमूर्ती वागताना पाहिले


साधुरूपी वृक्षसारे मानतो

सर्वकाही त्यागताना पाहिले


अर्चना मुरुगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा