Gazalअननज्वाला मात्रावृत्त 8-8-8=24

 


अननज्वाला
मात्रावृत्त 8-8-8=24

ऊर तडफडे आठवणीने चळल्यावरती
किंमत समजे  समीप आता नसल्यावरती

रोगराईत बंधन आले फिरण्यावरती
भले वाटते जगात आहे कळल्यावरती

मोल पाहुनी जमीन जुमला वाटे भारी
किंमत मिळते घाम गाळुनी कसल्यावरती

सगे सोयरे धावत येती पैश्यांसंगे
रंग जगाचे कळती गरीब असल्यावरती

जीवन वाटे नैराश्याने सदा रिकामे
उमगत जाई आनंदाने हसल्यावरती

अर्चना मुरूगकर



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा