Gazal
गझल
वृत्त -आनंदकंद
गागालगा लगागा गागालगा लगागा
गर्वास टाक साऱ्या जाळून माणसा तू
लीनत्व ठेव अंगी जोडून माणसा तू
सत्तेस लाटतो तू सोडून लाज सारी
मूल्यास बाणवावे शोधून माणसा तू
लोकात बोलतो तू आदर्श तेच सारे
सत्यात वाग तैसा शोधून माणसा तू
पोटात पाप काळे ठेवून हिंडसी का
घे माणसास साऱ्या सांधून माणसा तू
माणूस माणसाशी होवून वाग आता
मिथ्यातल्या मिजाशी सोडून माणसा तू
अर्चना मुरूगकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा